⚡कणकवली ता.२४-:
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पुढाकाराने कणकवली तालुका व्यापारी संघटना, कणकवली यांच्या सहकार्याने उद्या, सोमवार २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत हॉटेल साई दीप पॅलेस, रेल्वेस्टेशन समोर, कणकवली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या महत्त्वपूर्ण सभेसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबई या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे नांदगाव, कणकवली या ५ ही रेल्वेस्टेशनवरील समस्याबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे. त्याशिवाय कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात असलेल्या या ५ ही स्टेशनवर नवीन गाड्यांचे थांबे, आवश्यक सोयी/सुविधा, प्लॅटफॉर्मवर मोडून पडलेले निवारा शेड व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करून सर्व मागण्यांचे एकत्रित निवेदन तयार केंद्रीय रेल्वेमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून देण्याबाबत नियोजन एकमताने करण्यात येणार आहे. तरी कणकवली, वैभववाडी, देवगड आणि मालवण तालुक्यातील पीडित रेल्वे प्रवासी, कोकण रेल्वेबाबत आस्था असणाऱ्या नागरिक व सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यकर्त्यांनी सहकार्य, पाठिंबा आणि मार्गदर्शन करण्यासाठी या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे सचिव मिहीर मठकर व उपाध्यक्ष ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
