⚡सावंतवाडी ता.२४-: माजी केंद्रीय अर्थमंत्री, रेल्वेमंत्री प्रा मधू दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकांवर अद्यावत असे रेल्वे टर्मिनस व्हावे आणि प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जर नामकरण आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला नाही तर येत्या दि.२६ जानेवारी रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू,शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी खासदार निलेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे अशा मान्यवरांची मदत घेऊया. तसेच रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, कोकण रेल्वे अधिकारी यांनीही निवेदन देऊन पाठपुरावा करावा असे बैठकीत ठरले.
सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, सागर तळवडेकर, नंदन वेंगुर्लेकर, रवींद्र ओगले, सुभाष शिरसाट, जगदीश मांजरेकर, अँड. नकुल पार्सेकर, अमोल टेंबकर, तेजस पोयेकर, पुंडलिक दळवी, सागर नाणोसकर, सिद्धेश सावंत, नितेश देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली त्यात सावंतवाडी येथे परिपूर्ण आधुनिक असे टर्मिनस बनवावे आणि त्याचे प्राध्यापक मधू दंडवते असे नामकरण करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १५ रेल्वे गाड्यांना थांबा नाही. या गाड्या रत्नागिरी नंतर थेट गोव्यात थांबतात. अशा गाड्यांना प्रत्येक स्थानकावर किमान एक थांबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळावा.
अमृत भारत स्थानक योजना कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यासाठी पाठपुरावा करावा. त्याच प्रमाणे एक जिल्हा एक उत्पादन ही योजना देखील येथील स्थानकात लागू करावी
तसेच कोकण रेल्वेचे हॉस्पिटल कोकणात व्हावे.सावंतवाडी येथील एमटीडीसी मार्फत होणारे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रस्तावित रेलोटेल मार्गी लागावे. नेरळ माथेरान च्या धर्ती वर कणकवली – देवगड – मालवण – वेंगुर्ला – सावंतवाडी अशी टॉय ट्रेन साठी पाठपुरावा करावा आणि अन्य पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्याचे ठरले.
या बैठकीत स्वागत अँड. संदीप निंबाळकर तर आभारप्रदर्शन सचिव मिहीर मठकर यांनी केले.
