स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पतसंस्थांनी कामकाज गतिमान करावे…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी:बँकेमार्फत पतसंस्था समस्या विषयावर झाली बैठक.

ओरोस ता.२१-:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या पतसंस्थांबरोबर अन्य जिल्ह्यातील पतसंस्था तसेच काही मल्टीस्टेट पतसंस्था जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये बँका व पतसंस्थांची स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पतसंस्थांनी आपले कामकाज गतिमान करणे आवश्यक आहे. पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसाठी यापूर्वी जिल्हा फेडरेशनकडून कर्मचारी उपलब्ध होत होते. परंतु सद्यस्थितीत कर्मचारी होत नसल्याने कर्ज वसुलीला अडचणी येत आहेत. यासाठी संस्थांच्या मागणीनुसार संस्थांचे थकबाकीदार कर्जदार यांच्याबरोबर १०१ दाखल केलेले असल्यास बँकेकडून संस्थाना वसुलीसाठी मदत करावयाची ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या अडी-अडचणीवर चर्चा करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी नुकतीच सर्व नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांची सभा बँकेच्या सभागृहात आयोजित केली होती. या सभेस पतसंस्थांचे प्रतिनिधी, बँकेचे संचालक सुशांत नाईक, श्विठ्ठल देसाई आदी उपस्थित होते. यावेळी संस्थांचे अडचणी व सविस्तर चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page