गुरे वाहतुकीची अधिकृत परवानगी असताना स्थानिकांकडून मारहाण होत असेल तर कारवाई करा…

अमित सामंत: अन्यथा ॲक्शनला रिएक्शन केव्हा तर होईल..

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील तालुक्यात शेतकऱ्यांकडून होणारी गुरांची वाहतूक जर अनधिकृतपणे होत असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करा. परंतु, अधिकृत परवानगी असताना जर स्थानिक लोक महाराण करून त्यांची गुरे काढून घेतली जात असतील तर त्यांच्यावर निश्चित आपण कारवाई करावी अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान गुरांची वाहतूक करत असताना स्थानिक लोकांना त्या ठिकाणी कोणत्याही गाड्या अडून महाराणा करण्याचा अधिकार नाही. तसेच त्यांची गुरे देखील काढून घेऊन विकली जात आहेत. हे कुठेतरी चुकीचं होत चालले असून त्यामुळे निश्चित त्या टोळीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळ केली. दरम्यान यावर आपण निश्चितच कारवाई करू असे आश्वासन सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरांची वाहतूक ही अधिकृतपणे सर्व परवानगी असताना जर स्थानिक लोक गाड्या अडवून जर मारहाण करत असतील तर हे चुकीचं असून त्यामुळे अशा प्रकारामुळे केव्हातरी ॲक्शनला रिएक्शन होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे यावर तात्काळ आपण दखल घेऊन चुकीचे होत असलेले प्रकार रोखण्यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी देखील श्री सामंत यांनी यावेळी केली. दरम्यान जर शेतकऱ्यांकडून कोणत्याही चुकीच्या पद्धतीने वाहतूक होत असेल तर निश्चित तुम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करा अशी ही मागणी श्री सामंत यांनी यावेळी केली. परंतु स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारे मारहाण करणे किंवा गुरे काढून घेणे हा त्यांचा अधिकार नाही असे श्री सामंत यांनी यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत पुंडलिक दळवी, सावली पाटकर, हिदायतुल्ला खान, सचिन पाटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page