ठाकरे सेनेचे सावंतवाडी तालुक्यात आणखीन दोन युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…?

ठाकरेंच्या युवासेनेने सावंतवाडीत मोठी फूट:रामचंद्र गवस, विशाल सावंत यांचेही राजीनामे.

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील ठाकरे युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रामचंद्र गवस यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे तसेच सावंतवाडी युवा सेनेचे शहर अधिकारी विशाल सावंत यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दोघांच्या राजीनामामुळे ठाकरे सेनेला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.दरम्यान ठाकरे युवा सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने पुन्हा एकदा ठाकरे सेनेला जोरदार धक्का बसला असून युवा सेनेत गेले दोन दिवस उभी फूट पडून पक्षांमध्ये गळती लागली आहे.

दरम्यान ते आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची देखील उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. काल औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक सावंतवाडीत काल पार पडल्यानंतर ठाकरे सेनेत राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे आता ठाकरे सेनेतील वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले असून तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेला सावंतवाडी तालुक्यात हा मोठा धक्का मानला जात आहे.

You cannot copy content of this page