पंचायतन शुद्धीकरण विधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
लोककल्याणसाठी तसेच रयतेच्या सुखी समृद्धीसाठी येथील श्री बांदेश्वर-भूमिका मंदिरात आयोजित करण्यात आलेला पंचायतन शुद्धीकरण विधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

सोमवारी १८ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रायश्चित विधी, प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्यहवचन, नांदाश्राद्ध, संभारदान, प्राकारशुद्धी, श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र, श्री देवी भूमिका चरणी महापूजा, पंचायतन देवताना अभिषेक, पूजा, देवता स्थापन, नवचंडी जप, आरती, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झालेत.
आज मंगळवारी १९ रोजी सकाळी ८ ते १२.३० वाजेपर्यंत आवाहित देवता पूजन, चंडीहोम, दुर्गाहोम, पंचायतन योग, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक सांगता कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी १ वाजता आरती, नैवेद्य व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झालेत. दोन दिवसात हजारो भाविकांनी सोहळ्याला उपस्थित दर्शवत श्री बांदेश्वर भूमिका देवीचे दर्शन घेतले. ब्राम्हण वृंद व हजारो भाविकांच्या उपस्थितीत सार्वजनिक गाऱ्हाणे घातल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो :-
बांदा येथील श्री भूमिका मंदिरात महाआरतीसाठी उपस्थित असलेले

You cannot copy content of this page