प्रा.प्रज्ञा जोशी:नगरवाचनालयातर्फे संस्कृत व्याकरण कार्यशाळा..
⚡कणकवली ता.१८-: संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. ही भाषा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असे आवाहन प्राध्यापक प्रज्ञा जोशी यांनी केली.
कणकवली येथील नगरवाचनालयातर्फे वाचनालयात संस्कृत व्याकरण कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य वैजयंती करंदीकर, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, विनायक करंदीकर यांच्या वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. जोशी यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा व संस्कृत व्याकरणाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा ११० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
