हरेश पाटील:मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार..
⚡कणकवली ता.१८-:
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांनी खासदार व्हावे अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. “अब की बार भैय्या शेठ खासदार” अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी सांगितले.
किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे सबंध आहेत. त्यांची काम करण्याची वेगवान पद्धत ,तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता, विषयांची नियोजनबद्ध हाताळणी यामुळे दोन्ही जिल्ह्यातील असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते भैय्याशेठ यांना मानतात. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्याशी त्यांचे राजकारणापलीकडे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
