⚡कणकवली ता.१८-: माजी खासदार तसेच नियोजन आयोग माजी सदस्य मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ आणि ॐ नमो भगवते भालचंद्राय नमः मित्रमंडळ यांच्यातर्फे कुडाळ येथे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचाही सत्कार करण्यात आला. माजी खास. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा सत्कार राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांचा सत्कार खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते प्रसाद पाताडे आणि महेश वायंगणकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व मंडळाचे सर्वच सदस्य उपस्थित होते. भगवान कासले, प्रसाद घाडीगांवकर, अविनाश गावडे विशाल राजपूत, हेमंत नाडकर्णी, ज्ञानदेव मोडक, सईद नाईक आदी उपस्थित होते.
