बाल कला,क्रीडा महोत्सवात श्रावण नंबर 1 शाळेचे यश…

⚡कणकवली ता.१७-: पळसंब नं. 1 या शाळेमध्ये संपन्न झालेल्या श्रावण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात श्रावण नंबर 1 शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.


यामध्ये सांघिक खेळ प्रकारांमध्ये खो खो लहान व मोठा गट मुली-मुलगे प्रथम क्रमांक, कबड्डी लहान व मोठा गट मुली-मुलगे प्रथम, रिले 100×4 मोठा गट मुली-मुलगे प्रथम, तर रिले 50×4 लहान गट मुली प्रथम, समूहगीत लहान व मोठा गट प्रथम, समूहनृत्य लहान गट प्रथम तर मोठा गट द्वितीय, तसेच ज्ञानी मी होणार प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान व मोठा दोन्ही गट द्वितीय क्रमांक. त्याचबरोबर वैयक्तिक खेळ प्रकारात मोठ्या गटात 100 मीटर धावणे मुली आर्या समीर सडेकर प्रथम, 200 मीटर धावणे मुली वैदेही संतोष जाधव प्रथम, प्राची हरी परब द्वितीय, मुलगे ओमकार सुनील लाड प्रथम, नितेश सुरेश राणे द्वितीय, उंच उडी मुली भक्ती नागेश परब प्रथम, मुलगे मयुरेश मंगेश दळवी प्रथम, लांब उडी मुली प्राची हरी परब प्रथम, भक्ती नागेश परब द्वितीय, लहान गटात 50 मीटर धावणे मुली ऋतिका रुपेश परब प्रथम, तनिषा तुझ्या श्रावणकर द्वितीय, 100 मीटर धावणे मुली नव्या सुरेश राणे प्रथम, रेवा शिवराम परब द्वितीय, उंच उडी मुली ऋतिका रुपेश परब प्रथम, हर्षदा समीर वेदरे द्वितीय, मुलगे वेदांत सुरींदर यादव प्रथम, लांब उडी मुली नव्या सुरेश राणे द्वितीय, मुलगे खुशाल नितीन घाडी प्रथम अशा प्रकारे महात्मा गांधी विद्यालय श्रावण नं. 1 या शाळेने सर्वोत्तम यश संपादन केले आहे. या यशाबद्दल केंद्रप्रमुख देवू जंगले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, श्रावण गावचे सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष राजन यादव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, माता पालक संघाचे उपाध्यक्ष पायल परब, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष स्वप्निल कोळंबेकर यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, शमा कडूलकर, अमित पवार, या शाळेची माजी विद्यार्थीनी समृद्धी परब, पोषण आहाराच्या मदतनीस रोहिणी पवार, सुवर्णा दळवी यांनी कठोर परिश्रम घेतले. श्रावण केंद्र स्तरावरील सर्व यशस्वी खेळाडूंना सांघिक खेळ प्रकारात ट्रॉफी व प्रमाणपत्र तर वैयक्तिक खेळ प्रकारात मेडल आणि प्रमाणपत्र पळसंब शाळेचे मुख्याध्यापक विनोद रामचंद्र कदम यांनी आपले वडिल रामचंद्र आबा कदम यांच्या स्मरणार्थ प्रदान केली आहेत. आपल्या गाड्यांमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी श्रावण गावचे गणपत उर्फ छोटू पाटकर, स्वप्निल कोळंबेकर, देवेंद्र हावळ यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page