मळगाव येथील भूतनाथ देवाचा उद्या जत्रोत्सव…

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १७ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधी, भूतनाथ देवावर अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे – फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे, देवीला कोंबडा अर्पण करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात लोटांगण व तरंगासहीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री मळगाव येथील स्थानिक दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ, गावातील मानकरी व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page