५ कि.मी. मुख्य गटात पोईपचा भाग्येश पालव विजयी:पालघरचा यश जाधव व नागपूरची संजना जोशी ठरले वेगवान जलतरणपटू..
⚡मालवण ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण नगरपालिका आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्यावतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला महाराष्ट्र राज्यासह इतर ठिकाणच्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तेरा वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्गच्या भाग्येश पालव या जलतरणपटूने पाच किलोमीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भाग्येश पालव हा मालवण तालुक्यातील पोईप गावचा असून त्याच्या या यशामुळे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मालवणसह सिंधुदुर्गचे नाव झळकले आहे. तर स्पर्धेत मुलांच्या गटात पालघरच्या यश जाधव तर मुलींच्या गटात नागपूरच्या संजना जोशी यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकाविला.
मालवण चिवला बीच येथील समुद्रात आज १३ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक परब यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. त्यावेळी राज्य अध्यक्ष सुधाकर शानभाग, राज्य सचिव राजेंद्र पालकर, उपाध्यक्ष संदीप परब, निल लब्दे आदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक परब म्हणाले, राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अनेक ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामुळे या स्पर्धेचे महत्व वाढते. येणाऱ्या स्पर्धकांचे आदरातिथ्य करण्याची संधी मिळाल्याने मालवणचे पर्यटनही वाढते. स्पर्धेत सहभागी झालेले हजारो स्पर्धक चिवला बीच येथील समुद्रात आपले सर्वस्व पणाला लावून पोहत असल्याने चिवला बीचसह मालवणचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार जाते, या स्पर्धेचा १३ वर्षाचा प्रवास यापुढेही असाच सुरु ठेवूया, असेही डॉ.परब म्हणाले.
या स्पर्धेत मुले, मुली, पुरुष व महिला अशा विविध गटात एक, दोन, तीन व पाच किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या. तर इतर गटाच्या स्पर्धा उद्या १७ रोजी होणार आहेत.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – ८ ते १० वर्षे एक किलोमीटर- मुले- रुद्र गुप्ता (ठाणे), रणवीर भोईर (ठाणे), विघ्नेश बरागे (कोल्हापूर), मुली- श्रीनिथी कुमार (ठाणे), शरन्या बरागे (कोल्हापूर), ओवी चिंदरकर (ठाणे), ११ ते १२ वर्षे २ किलोमीटर- मुले- वेदांत मिसळे (बेळगाव), शार्दूल लाटे (पुणे), तनय लाड (ठाणे), मुली- रेवा परब (ठाणे), निधी कुलकर्णी (बेळगाव), आयुषी अखाडे (ठाणे).
५६ वर्षावरील गट २ किलोमीटर- पुरुष- नारायण हजारे (सांगली), महादेव तवारे (पुणे), शिरीष पत्की (पुणे), महिला गट- गायत्री फडके (पुणे), स्वस्थिका गिरकर (रायगड), वर्षा कुलकर्णी (सांगली), १६ ते १८ वर्षे ५ किलोमीटर- मुले- यश जाधव (पालघर), धैर्यशील भोसले (कोल्हापूर), स्मरण मंगलोरकर (बेळगाव), मुली- संजना जोशी (नागपूर), श्रावणी वालावलकर (रत्नागिरी), मिहिका कोळंबकर (मुंबई), १९ ते २५ वर्षे ५ किलोमीटर- मुले- भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), वरद कुवर (नाशिक), ताहीर मुलानी (कोल्हापूर), मुली- सुबिया मुलानी (कोल्हापूर), स्नेहल जोशी (नागपूर), दयीता बंगेरा (मुंबई).
१३ ते १५ वर्षे ३ किलोमीटर- मुले- आदर्श मिश्रा (नाशिक), धवल हणमन्नावर (बेळगाव), अनिश पई (बेळगाव), मुली- आरोही पालखडे (रत्नागिरी), आत्मजा शहाणे (नाशिक), ओवी शहाणे (नाशिक). २६ ते ३६ वर्षे- ३ किलोमीटर- पुरुष- प्रीतम पाटील (सांगली), अक्षय महातो (मुंबई), उर्मित पटेल (नागपूर), महिला- स्नेहा रहाटे (रत्नागिरी), आसावरी निरगुटे (नाशिक), ऋतुजा भागवत (नाशिक), ४६ ते ५५ वर्षे ३ किलोमीटर- पुरुष- संजय जाधव (सांगली), किशोर पाटील (रायगड), संजय वालावडे (सांगली), महिला- महेश्वरी सरनोबत (कोल्हापूर), सुनीता धोते (नागपूर), रेणुका मेनन (मुंबई), ३६ ते ४५ वर्षे- महिला- नुषीन नळवाला (पुणे), गीतांजली चौधरी (ठाणे), अंजली गजभिये (नागपूर), पुरुष- गिरीश मुलूक (पुणे), गगन देशमुख (कोल्हापूर), राहुल राणे (मुंबई) यांनी यश मिळविले.
एक किलोमीटर मुलांच्या गटात रुद्र गुप्ता (ठाणे), मुलींच्या गटात श्रीनिथी कुमार (ठाणे) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. २ किलोमीटर मुलांच्या गटात वेदांत मिसळे (बेळगाव), मुलींच्या गटात रेवा परब (ठाणे) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. ३ किलोमीटर मुलांच्या गटात आदर्श मिश्रा (नाशिक), मुलींच्या गटात आरोही पालखडे (रत्नागिरी) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकाविला.
यावेळी आमदार वैभव नाईक, मुख्याधिकारी संतोष जिरगे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, यांच्यासह मालवणचे पत्रकार व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक, मेडल, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला माजी नगरध्यक्ष सुदेश आचरेकर, धोंडी चिंदरकर, सुधीर साळसकर, अरविंद मोंडकर, उमेश सांगोडकर आदी व इतर मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
