मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर प्रथम…

⚡सावंतवाडी ता.१६-: मळगाव येथील कै उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेच्या पाचवी ते सातवी गटात आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. मोबाईल मुळे हरवतेय बालपण या विषयावर तिने वकृत्व कथन केले होते.

गगेल्या दहा दिवसातील हे तिसरे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असून सलग तीन पारितोषिके पटकावून जेतेपदाची हॅटट्रिक केली आहे. विशेष म्हणजे तिन्ही स्पर्धेत वेगवेगळे विषय होते. अस्मि हिला तिची आई प्रा सौ सुषमा मांजरेकर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल अस्मि हिचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री.पी.एम.सावंत , पर्यवेक्षिका श्रीम. बी.आर.चौकेकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, वर्गशिक्षिका सौ शुभांगी देसाई व शिक्षकांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page