⚡सावंतवाडी ता.१५-: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना सावंतवाडी येथे त्यांनी विधानसभा कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, एकनाथ नाडकर्णी, प्रसन्न उर्फ बाळू देसाई, चंदन नाईक आदी उपस्थित होते
