प्रदीप नाईक:तात्कळ तोडा; अन्यथा तिव्र आंदोलन..
⚡दोडामार्ग ता.१५-: मणेरी ते कुडाशे, साटेली- भेडशी तिठा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुतर्फा झाडी वाढलेली आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.समोरुन येणारी वाहने, पादचारी ग्रामस्थ , गुरे- ढोरे अचानक न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तात्कळ लक्ष घालून या रस्त्याच्या दुतर्फ वाढलेली झाडी तोडावी अन्यथा बांधकाम विभागाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडणार असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेना मणेरी उपविभाग प्रमुख प्रदीप नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
