संपावर गेलेल्या डाकसेवकांचा १८ रोजी ओरोस येथे मोर्चा…

⚡मालवण ता.१५-:
देशातील तीन लाख ग्रामीण डाकसेवक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. १२ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत, अशी माहिती डाकसेवक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष हरियान, सेक्रेटरी तुकाराम गावडे, माजी कामगार नेते अभिमन्यू धुरी यांनी दिली. दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ओरोस येथे आकाशवाणी केंद्र ते डाक कार्यालय असा डाकसेवकांचा मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे, तसेच संपाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे ७०० डाक सेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरातील ग्रामीण भागातील टपाल देवाण-घेवाण व जनतेला केंद्र सरकारच्या ज्या सुविधा मिळायला हव्या, त्या ठप्प झाल्या आहेत. पैसे देवाण घेवाण, मनिऑर्डर, बूकिंग रजिस्टर, बूकिंग पार्सल, व्हीपी पार्सल, वीज व फोनबिल, ग्रामीण टपाल जीवन विमा हप्ता तसेच ग्रामीण भागातील टपाल बटवडा आदी कामे १०० टक्के ठप्प झाली आहेत, असा दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे. डाकसेवकांच्या मागण्याबाबत संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार विनायक राऊत यांनाही निवेदने दिली आहेत.

You cannot copy content of this page