⚡मालवण ता.१५-: महाराष्ट्र राज्यात सरपंच सेवा संघाची स्थापना करण्यात आली असून या संघाच्या मालवण तालुका महिला अध्यक्ष पदी कोळंब गावच्या सरपंच सौ. सिया रामचंद्र धुरी यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच संघटित चळवळीचे नेते व संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी या निवडीचे पत्र सौ. सिया धुरी यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्यात सरपंच सेवा संघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक अहमदनगर येथे पार पडली. या बैठकीत यामध्ये जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सिया धुरी यांची मालवण तालुका महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून ही निवड दोन वर्षासाठी असणार आहे. सरपंच सेवा संघटनेमार्फत मालवण तालुक्यातील सरपंचांना संघटित करून एकजूट निर्माण करण्याची जबाबदारी सिया धुरी यांच्यावर सोपविण्यात आली असून संघटनेच्या तालुका कार्यकारिणी निवडीचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. या निवडीबद्दल सिया धुरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
