मालवण तालुका शासकीय निमशासकीय सहकारी संस्था अध्यक्षपदी प्रमोद मोहिते…

⚡मालवण ता.१४-:
मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था मर्यादित मालवणच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रमोद लक्ष्मण मोहिते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीकृष्ण तळवडेकर यांचा तीन मतांनी पराभव केल्याने श्री मोहिते हे या संस्थेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले तर उपाध्यक्ष पदासाठी मारुती रत्नोबा सोनवडेकर हे विजयी झाले आहेत.

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था मालवणच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज मालवणचे सहाय्यक निबंधक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अजय हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नूतन संचालक गंगाराम माकू कोकरे, मंगेश विजय परब, विठ्ठल विश्वनाथ मालंडकर, प्रशांत रमाकांत पारकर, सूरज मधुसूदन गवंडी, हेमंत श्रीकृष्ण तळवडेकर, प्रताप महादेव बागवे, प्रमोद लक्ष्मण मोहिते, हनुमंत गणेश प्रभू, श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, सुप्रिया कृष्णा गावकर, जयश्री श्रीनिवास हडकर, मारुती रतनोबा सोनवडेकर, विनोद सखाराम सातार्डेकर, गंगाराम जनार्दन आडकर तसेच सेक्रेटरी प्रमोद परब हे उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीसाठी प्रमोद लक्ष्मण मोहिते, श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, गंगाराम जनार्दन आडकर या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र श्री आडकर यांनी अर्ज मागे घेतल्याने
प्रमोद लक्ष्मण मोहिते आणि श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत प्रमोद मोहिते यांना नऊ मते मिळाली आणि तळवडेकर यांना सहा मते मिळाल्याने श्री. मोहिते हे तीन मतांनी विजयी झाले तर उपाध्यक्ष पदासाठी हनुमंत प्रभू आणि मारुती सोनवडेकर यांच्यात होऊन श्री सोनवडेकर हे विजयी झाले

यावेळी नूतन अध्यक्ष प्रमोद मोहिते व उपाध्यक्ष मारुती सोनवडेकर यांचे उपस्थितानी अभिनंदन केले

You cannot copy content of this page