नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार…

⚡कणकवली ता.१४-: नागपूर येथे बेसा गावातील जयंतीनगर ५ येथील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने जेष्ठ नागरिक गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आ. वैभव नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर,आमदार महेश चौगुले, आमदार विकास कुंभारे, आमदार जयंत आसगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

You cannot copy content of this page