कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ येथे भात खरेदीचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली येथे शासकीय भात खरेदी शुभारंभ कणकवली येथे तालुका कृषी अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, गुरुप्रसाद वायंगणकर, प्रशांत सावंत, श्रीमती लीना परब, विनिता बुचडे, सिंधुदुर्ग बँक संचालक विठ्ठल देसाई, शेतकरी राजन परब, मनोहर राणे, जनार्दन डोबकर तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत भात नोंदणी केली नाही त्यांनी त्वरित नोंदणी करावी. तसेच नोंदणी करण्याची तारीख ही ३० डिसेंबर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

You cannot copy content of this page