कणकवली येथे १५ रोजी पोलीस पाटील भरती परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा…

⚡मालवण ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस पाटील नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली असून कणकवली,देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत १३४ पोलिस पाटील पदांच्या भरती साठीची लेखी परिक्षा येत्या रविवारी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांकडून या परिक्षेची पुर्वतयारी करून घेण्यासाठी ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्ग तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कणकवली रेल्वे स्थानका नजिकच्या वाळकेश्वर मंगल कार्यालय, मुडेडोंगरी येथे शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायं.४.३० यावेळेत करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर्व परिक्षार्थींसाठी खुली व मोफत आहे.

या कार्यशाळेमध्ये पोलिस पाटील पद भरतीसाठीच्या लेखी परिक्षेचे स्वरूप व प्रश्नपत्रिका सोडविताना घ्यावयाची काळजी, अपेक्षित प्रश्न या विषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद वळंजू आणि पो.पा.संघटनेचे अनुभवी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनाही महासंघातर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. तरी या कार्यशाळेचा लाभ कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातील सर्व परिक्षार्थींनी घ्यावा, अधिक माहिती साठी महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन ओ.बि.सी. आरक्षित समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी केले आहे.

You cannot copy content of this page