सोनावल येथील साकव पूलाचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡दोडामार्ग ता.१३-: तालुक्यातील सोनावल येथील साकव पूलाचे आज शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या सकवा साठी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या वर्षीक जिल्हा नियोजन मधून ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले.

यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,शैलेश दळवी, सरपंच सौ सोनाली गवस,मायकल लोबो, रामदास मेस्त्री, संजय गवस,सचिन देसाई,मनिषा गवस,व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page