सावंतवाडीतून केसरकरच तर कुडाळमधून महायुतीचा उमेदवार…

रवींद्र फाटक: लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमचा पक्ष इच्छुक;महायुती जो उमेदवार ठरेल त्याचे आपण काम करणार…

⚡कुडाळ ता.१२-: सावंतवाडी मतदारसंघातून विद्यमान आमदार दीपक केसरकरच तर कुडाळ मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार असेल, अशी स्पष्टोक्ती आज (मंगळवारी) शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग पक्षनिरीक्षक आमदार रवींद्र फाटक यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सहाजिकच लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमचा पक्ष इच्छुक आहे. मात्र, महायुती जो उमेदवार ठरवेल त्याचे आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page