Headlines

२० मार्च रोजी सावंतवाडी येथे होणारी संकल्प परिषद कोरोनामुळे तूर्तास रद्द…

बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा भूमी संवर्धन समितीची माहिती_*

*💫सावंतवाडी दि.१५-:* येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा भूमी संवर्धन समितीने येत्या २० मार्च रोजी सावंतवाडी येथे आयोजित केलेली संकल्प परिषद कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समितीने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. या पत्रकात द म्हटले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका।खून खटल्यातील आरोपीचे वकील म्हणून आल्या नंतर त्यांनी संस्थानला भेट दिली होती.।शिवाय।जेल नजीकच्या जागेत समाजाची जाहीर सभाही घेतली होती. या ऐतिहसिकदृष्ट्या महत्वाच्या भेटीचे कायम स्मरण होण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी एकत्र येत प्रेरणा भूमि संवर्धन समितीची स्थापना दीपक पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली करून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार येत्या २० मार्च रोजी जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली होती तेथेच या संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सध्या पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव निर्माण झाल्याने हा मेळावा तूर्त पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page