कुणकेरी येथील शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फुटली

शहराचा पाणी पुरवठा बंद:ग्रामस्थानी घेतली नगराध्यक्ष परब यांची भेट;सहकार्य करण्याचे नगराध्यक्षाचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी कुणकेरी येथून शहराला पाणी पुरवठा होणारी मुख्य पाईपलाईन अज्ञात व्यक्तीने फोडली असल्याची माहिती अधिकारी भाऊ भिसे यांनी नगराध्यक्ष संजू परब याना दिली आहे. त्यामुळे शहरातील काही प्रभागात पाणी येत नाही आहे. त्यामुळे नागरिकांनचे प्रंचंड हाल होत आहे. त्यामुळे तेथील काही नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली होती. मात्र पाईपलाईन फूटल्याने काम होण्यास दोन दिवस लागतील त्यामुळे नगराध्यक्षांनी नागरिकांना पाण्यापासून वंचित राहू नये तशीच गैरसोय होऊ नये म्हणून नगराध्यक्षांनी टॅंकर उपलब्ध करू दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्षांचे आभार मानले आहेत. यावेळी सावंतवाडीतील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page