मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या…

विजय प्रभू: जिल्हा कृषी अधीक्षकांजवळ केली मागणी..

कुडाळ : मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय सुरेश प्रभू यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांजवळ निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात प्रभू यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना सन २०१३-२४ च्या आंबा व काजु फळपिक विम्याचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तसेच मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हे पिंगुळी मंडळाच्या ट्रिगर प्रमाणे देण्याचे ठरले, असताना सुध्दा आपणाकडून कुडाळ मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचे पैसे वाटप झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामूळे मडगाव मंडळातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे तरी आपल्याकडून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून पूर्वीप्रमाणे पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे शेतकऱ्यांना फळपिक विम्याचे पैसे त्वरीत मिळावेत, व शेतकऱ्यांवरील अअन्याय दूर करून सहकार्य करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येई, असा इशारा दिला.

You cannot copy content of this page