नॅब नेत्र रुग्णालय येथे आजपासून नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू…

सावंतवाडी : नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी येथे आजपासून नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे.

या शस्त्रक्रिया विभागाचे उदघाटन डॉ. विद्याधर ताईशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी रोटरी प्रेसिडेंट विनया बाड, जगदाळे, सोमनाथ जिन्नी, डॉ. संकेत कुलकर्णी, अनंत उचगावकर आदी उपस्थित होते.

डॉ. संकेत कुलकर्णी यांनी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ह्या शस्त्र क्रिया केल्या. सर्व नेत्र रुग्णांनी अत्यंत कमी खर्चात नेत्र शस्त्र क्रिया व लेन्स बसवून मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत नॅबचे आभार मानले.

You cannot copy content of this page