आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव १५ डिसेंबर रोजी..

⚡सावंतवाडी ता.११-: तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी होणार असून या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम नवसफेड, केळी ठेवणे, भूमिका देवीची ओटी भरणे असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
तसेच रात्री दहा वाजता पुराणकथा वाचन, सवाद्य आरती, मिरवणूक व त्यानंतर सुप्रसिद्ध वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आह. तरी आजगाव दशक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व आजगाव ग्रामस्थांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावकर मंडळीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page