⚡सावंतवाडी ता.११-: प्रसाद आरविंदेकर यांची अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया एकेएफआय या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया सन 2023 ते 27 या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया न्यू दिल्ली येथे पार पडली. यामध्ये 28 राज्य व आठ केंद्रशासित राज्याची प्रतिनिधी सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रिया तेलंगणा आंध्राचे रिटायर्ड जस्टीस डीएसआर वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये महाराष्ट्रातून श्री प्रसाद आरविंदेकर यांची एकेएफआय या संस्थेवर व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. तशी घोषणा जस्टीस डी. एस, आर. वर्मा यांनी जाहीर केली. निवड होतात अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया एकेएफआय चेअरमन आनंद चव्हाण अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, एककेएफआय चे सेक्रेटरी उशी रेड्डी, दिल्लीचे राधेश्याम सैनी व वर्ल्डकबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ढोरजी लांबा नेपाळचे सेक्रेटरी भक्ता संजू यांनी अभिनंदन केले
