चैत्राली मेस्त्री हीचा खून…

चुलत दिराला पोलिसांनी केले अटक: उद्या करणार न्यायालयात हजर..

⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील सबनीसवाड्यात भाड्यानं रहणाऱ्या खेड येथील चैत्राली मेस्त्री 35 या विवाहितेनं आत्महत्या केल्याच वृत्त समोर आलं होतं. परंतु, कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, हा घातपात असल्याच पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या गुन्ह्याचा छडा लावत संशयित चुलत दिराला संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री   याला ताब्यात घेतले असून भिंतीवर डोके आपटून त्यानंतर ओढणीने गळफास लावत तिला जीवे ठार मारल्याची कबुली त्यांन दिली आहे. याप्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page