Headlines

समन्वय समितीच्या 14 डिसेंबर पासूनच्या बेमुदत संपास सीटूचा जाहीर पाठिंबा…

⚡कणकवली ता.११-:
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जात आहेत, या संपाची दखल राज्य शासनाने ताबडतोब घेऊन त्यांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढावा. असे आवाहन सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा कॉ. प्रियांका तावडे व सचिव कॉ. विजया पाटील यांनी करीत संपाला
पाठिंबा दर्शविला आहे.

जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करा, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरा, समान कामाला समान वेतन या आदेशाची अंमलबजावणी करा व अशा इतर एकूण 18 मागण्यांसाठी मार्च महिन्यात पुकारलेल्या संपाच्या वेळी राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना काही आश्वासने दिलेली होती. पण दहा महिने उलटून गेले तरी त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संपाचा इशारा देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page