कणकवली येथील गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची जामीनावर सुटका…

⚡मालवण ता.११-: कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर १३० ग्राम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा (वय २४) राहणार सिलधारा, पहाडी खेरा, मध्यप्रदेश याची कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे मालवणचे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय चिंदरकर व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी संशयित आरोपी
उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा याला कणकवली पोलिसांनी गांजा विक्री करण्याच्या संशयाखाली अटक केली होती व त्याच्या ताब्यातील १३० ग्राम गांजा सदृष्य अमली पदार्थ जप्त केला होता. त्याप्रमाणे कणकवली पोलिस ठाण्यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणाआरे पदार्थ कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब)ii (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

दि. ११ डिसेंबर रोजी पोलिसांनी संशयित आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा याला कणकवली न्यायालयात हजर करुन तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलिसांची पोलिस कोठडीची मागणी फेटाळून आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

त्यानंतर आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा याच्यातर्फे दाखल केलेला जामीन अर्ज सुनावणीअंती न्यायालयाने मंजूर करीत आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा याची १५ हजार रुपयाच्या जामीनावर मुक्तता केली.

You cannot copy content of this page