शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यास प्रारंभ…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांकडून आज भात खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री देव्या सुर्याजी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

२०२३-२४ साठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा ह्यावर्षीच्या भात खरेदीस आजपासून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून भात खरेदी करण्यात येणार आहे.यावेळी सागर गावकर रामचंद्र चव्हाण बंड्या पवार नाना पवार अॅलेक्टन रॉड्रीक्स पंकज मडये व ग्रामीण भागातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page