भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर:पुतळ्याला लाथा मारत व्यक्त केला निषेध..
⚡सावंतवाडी ता.११-: काँग्रेसचे झारखंडचे खासदार धीरज साहू यांच्या घरात आयकर विभागाने धाड टाकून तीनशे कोटींची रोकड जप्त केली. त्यामुळे काँग्रेस कशाप्रकारे भ्रष्टाचारी पक्ष आहे, याचे उत्तम उदाहरण साहू यांच्या मार्फत दिसून आले आहे. तसंच त्यांच्या नोटा मोजता मोजता मशीन देखील बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास केल्याचा आरोप भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांनी आज येथे केला. दरम्यान युवा मोर्चा महिला भाजपच्या वतीने आज सावंतवाडी भाजप कार्यालय येथे साहू यांच्या पुतळ्याला लाथा मारत जोरदार घोषणाबाजी देत निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी कोरगावकर पुढे बोलताना म्हणाल्या की काँग्रेसने गेले अनेक वर्ष सत्ता भोगली. परंतु त्यांनी जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास करून या देशात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे जनतेचा आता काँग्रेसवर विश्वास राहिला नसल्याने पुन्हा एकदा 2024 मध्ये या भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करून पुन्हा एकदा मोदी सरकारला सत्तेवर येणार असल्याचा दावा देखील सौ. कोरगावकर यांनी व्यक्त केला.दरम्यान एवढा भ्रष्टाचार करून देखील अद्याप त्याचे पोट भरत नसल्याची टीपणी देखील सौ. कोरगावकर यांनी यावेळी केली आहे.
