⚡कुडाळ ता.१०-: जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त विष्णु गंगाराम माणगावकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय, कला , क्रिडा, दशावतार, पर्यटन अशा विविध क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवरत्न मधील एक रत्न म्हणुन सिंधुदुर्ग कोकणरत्न गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
त्यांचे सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकिय क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.
ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन्स व सिंधु सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळा कुडाळ येथे संपन्न झाला.
सोहळ्याचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडके यांच्या हस्ते झाले. यावेळी सिने अभिनेत्री राजश्री काळे, विजय मानावतकर, नम्रता गावकर, महेश कुंटे, प्रा. बी. एन. खरात आदी उपस्थित होते. यापुर्वीही विष्णु माणगावकर यांना राज्यस्तरीय युवा चित्रकार पुरस्कार २०१४, कलाश्री पुरस्कार २०१७, राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार २०१७, सांस्कृतिक साहित्य पुरस्कार २०१७, महाराष्ट्र कला शिव सन्मान २०२३, महाराष्ट्र कलारत्न गौरव पुरस्कार २०२३ , उत्कृष्ट कला शिक्षक पुरस्कार २०२३ आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
