रेल कामगार सेनेचा बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयवर 11 रोजी भव्य मोर्चा…

⚡सावंतवाडी ता.०९-: रेल कामगार सेनेचा कोंकण रेल्वे कार्यालय बेलापूर या मुख्य कार्यालयावरती ११ डिसेंबर २०२३ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे . प्रकल्प ग्रस्त याना डावलून अन्य उमेदवार याची कंत्राटी भरती केली गेली आहे .याला विरोध म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनावरती (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) भव्य मोर्चा रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते माननीय विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी ,सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली कोंकण रेल्वे प्रशासनावरती भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात कोंकण रेल्वे मध्ये सुरक्षा कॅटेगरीमध्ये असेलेले पॉईंट्समन आणि गेट मन यांची खाजगीरित्या भरती करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम प्रशासन करत असल्यामुळे तसेच यासंदर्भात मान्यता असूनही सुरक्षेच्या असणाऱ्या १९० जागा कोंकण रेल्वे बनत असताना ज्यांच्या जमिनी प्रकल्पसाठी गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांची भरती न करता कॉन्ट्रॅक्ट भरती केल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त तसेच कोकण रेल्वेचे ‘कामगार यांच्यामध्ये तीव्र असंतोष असून त्या विरोधात सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर कोंकण रेल्वे भरती कुठलीही कॉन्ट्रॅक्ट भरती करु नये आणि यापुढे होणार्‍या सर्व भरतीसाठी प्रकल्पग्रस्तांचा विचार प्रामुख्याने करावा तसेच कोकण रेल्वेचे विद्युतीकरणही अतिशय जलद गतीने पूर्ण झाले असून आता कोंकण रेल्वे हा भारतीय रेल्वेमध्ये जोडून स्वतंत्र झोन निर्माण करावा ,जेणेकरुन कार्यरत असेलेले कोंकण रेल्वेचे कर्मचारी आणि येणारे नवनियुक्त कर्मचारी यांना भारतीय रेल्वे प्रमाणे संपूर्ण फायदे मिळतील. कामगारांचे हित लक्षात घेऊन या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे असे कोंकण रेल्वे सरचिटणीस राजू सुरती यांनी सांगितले. त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष विलास खेडेकर,’मीनाज झारी, विश्‍वास राणे, मुर्गसन, नागराज देवाडिंगा, शशी नायर, प्रेम कुमार, राहुल पवार, दत्ता तेलंगे, रवि गुजर, गणपत दलवी, गुरव, प्रमोद ऐच, कनोजिया, गाजा गाईकर, उपस्थित होते. या मोर्चाला कोंकण रेल्वेतील सर्व कर्मचारी तसेच कोंकण रेल्वेवरती असणारे प्रकल्पग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातूनही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळें या बेलापूर येते होणाऱ्या मोर्चा मध्ये रेल्वे कर्मचारी व कोंकण रेल्वेवरती असणारे प्रकल्पग्रस्त महाराष्ट्र ,कर्नाटक,गोवा या राज्यातूनही उपस्थित राहवे असे आवाहन रेल्वे कामगार सेना कोकण रेल्वे सरचिटणीस राजू सुरती यांनी केले आहे.

You cannot copy content of this page