जिल्ह्यातील एकमेव महिला पुणे येथील संस्थेकड़ून महिला दिनी सन्मान
सिंधूदुर्गनगरी ता १४ शाळाबाहय विदयार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणा-या मालवण पंचायत समिती मधील गटसाधन केंद्र मालवण येथे कार्यरत असणा-या विषय साधन व्यक्ती श्रीम आरती कांबळी-वायंगणकर यांचा बालरक्षक पुरस्काराने पुणे येथे जागतीक महिला दिनी सन्मान करण्यात आला. पुण्याच्या एससीईआरटी (विदया परिषद ) या संस्थेच्यावतीने त्यांना चॅलेंजर ऑफ चँम्प या विशेष पुरस्काराने गौरविले आहे. शिक्षण हक्क कायदयानुसार तीन ते अठरा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. सहा ते चौदा वर्षे वयोगटातील कोणतेही मुल शाळाबाहय राहू नये म्हणून महाराष्ट्र शाासनाने 2017 पासून अशा शाळाबाहय मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याचे अभियान हाती घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातही वेळोवेळी शाळाबाहय सर्वक्षणाची विशेष मोहिम हाती घेतली जाते शाळाबाहय विदयार्थी शाळेत दाखल केले जातात. सर्व गाव , वाडी, वस्ती व चीरेखाण परिसरात तसेच मच्छीमारी करण्यासाठी बांधकाम करणेसाठी येणारी तसेच भटके जीवन जगणा-या पालकांची मुले मध्येच शाळा सोडून ते आपल्या पालकांसोबत कामानिमित्त बाहेरगावी जात असतात.अशा मुलांचा शोध घेउन त्यांना वयानुरूप त्यांच्या वर्गात दाखल करायचे असते.अशा मुलांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाकार्यातून बालरक्षक मोहिम हाती घेतली आहे . सिंधुदुर्ग जिल्हयातील पंचायत समिती मालवण येथे कार्यरत विषय साधन व्यक्ती आरती कांबळी-वायंगणकर यांनी मालवण तालुक्यातील कट्टा, शिरवंडे, चौके येथे बांधकाम चिरेखाण परिसरात येणा-या पालकांना वेळोवेळी शिक्षणाचे महत्व सांगून व शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्यांच्या पाल्यांना जवळच्या शाळेत दाखल करून घेतले. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्ष्ण देणेसाठी शिक्षकांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न केले . त्यांच्या या कार्याची दखल पुण्याच्या एससीईआरटी (विदया परिषद ) यांनी घेत त्यांना या कार्यासाठी चॅलेंजर ऑफ चँम्प या विशेष् पुरस्काराने गौरविले आहे. यावेळी एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक डॉ .कमलादेवी आवटे, डाएट पुण्याच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे, परभणीच्या शिक्षणाधिकारी सुचित्रा पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. फेसबुक पेजवर लाइव्ह ऑनलाईन पदधतीने सन्मानपत्र देउन त्यांना गौरविण्यात आले.विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त करणा-या सिंधुदुर्ग जिल्हयातून आरती कांबळी या एकमेव महिला होत्या. त्यांच्या या यशासाठी त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. फोटो:-आरती कांबळी
