*शिवप्रेमी यशवंतगड आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान करत पंचक्रोशीतील युवक युवतींनी छत्रपती संभाजी महाराजांना वाहिली आदरांजली

*💫वेंगुर्ले दि.१४-:* धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त यशवंत गड रेडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला पंचक्रोशीतील युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा मास शिवप्रेमी धर्मवीर बलीदान मास पाळत महिनाभर आपल्या धर्मासाठी व स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहत सुतक पाळतात. छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण आजच्या युवा पिढीला व्हावे यासाठी शिवप्रेमी यशवंतगड यांच्याकडून आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३८ शिवप्रेमींनी रक्तदान केले आहे. यावेळी प्रार्थनेद्वारे छत्रपती संभाजी महाराज याना आदरांजली वाहत या शिबिराचा समारोप करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page