शिवसेनेचे चिंदर पंचायत समिती मतदार संघात आयोजन
मालवण (प्रतिनिधी) खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना चिंदर पंचायत समिती मतदारसंघ आयोजित व शिवउद्योग मालवण तालुका प्रमुख मंगेश गांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता चिंदर गावडेवाडी हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कणकवली येथील विवेकानंद नेत्रालय यांचे तज्ञ डॉक्टर कडून तपासणी करून मोफत चष्मा वाटप कार्यक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना आम.वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, या विभागातील विभाग प्रमुख शाखाप्रमुख उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे अटी व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
