*💫मालवण दि.१४-:* मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक, कर्णधार तथा मालवणचे माजी नगराध्यक्ष कै. लीलाधर हडकर यांच्या प्रथम स्मृतिदिन प्रित्यर्थ मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचच्या वतीने मालवण येथे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. १३, १४ मार्च बॅडमिंटन, १५ मार्च हॉलीबॉल तर १६, १७ मार्च रोजी बोर्डिंग ग्राउंड येथे लेदर क्रिकेट स्पर्धा होत आहे. मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग ग्राऊंड येथील जयगणेश इंग्लिश स्कुल बॅडमिंटन कोर्ट येथे या स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जयगणेश इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर, डॉ. राजेश्वरी वझे, बॅडमिंटन प्रशिक्षक महेश परब, ऑस्टिन फर्नांडिस, मितेश मिठबावकर, निवृत्त क्रीडा शिक्षक शंकर पराडकर, भाऊ हडकर, यजुवेन्द्र हडकर, सागर हडकर, उल्हास हडकर, नंदू देसाई, पप्पू परब, रवी तळाशीलकर, अरविंद सराफ, विक्रम मोरे, निळकंठ मालणकर, बबन रेडकर, दिपक धुरी, प्रफुल्ल धुरी, संदीप शिरोडकर, ऍड. दिलीप ठाकूर, बाळा मुणगेकर, विजय परुळेकर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
लीलाधर हडकर यांच्या स्मृतिदिनी प्रित्यर्थ विविध खेळांच्या सामन्यांचा शुभारंभ….
