सावंतवाडी तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी तानाजी सावंत…

तर उपाध्यक्षपदी पदी नितीन नाईक:पोलीस पाटील संघटनेच्या सभेत नूतन कार्यकारीणी जाहीर…

⚡बांदा ता.०७-: सावंतवाडी तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी कुणकेरीचे पोलिस पाटील तानाजी सावंत, उपाध्यक्षपदी मडुऱ्याचे पोलिस पाटील नितीन नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पोलीस पाटील संघटनेच्या सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत नुतन कार्यकारीणिची निवड करण्यात आली.

कार्यकारीणीच्या पुढिल प्रमाणे सचिवपदी लक्ष्मण गावकर (ओटवणे), सहसचिवपदी संदिप सातार्डेकर (सातोसे), खजिनदारपदी धोंडी जाधव (तळवडे) यांची तर सदस्यपदी विनोद जाधव (माजगाव), सौ. जागृती गावडे (इन्सुली) सौ. निर्जरा परब (रोणापाल), सौ. विनिता मयेकर (सातार्डा), प्रशांत पंडीत (कास), अनंत मालवणकर (दांडेली) यांची तर सल्लागारपदी अरुण परब (सातोळी) विनायक कोळापटे (असनिये) यांची निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page