⚡वैभववाडी ता.०६-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्वच विचारप्रवाहांना समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या क्रांतिकारी विचारवंताची मते समजून घेणे एकप्रकारे लोकशाही समजून घेण्यासारखे आहे. असे प्रतिपादन प्रा. आर.एम.गुलदे यांनी केले.
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महीला मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक वैभववाडी येथे संपन्न झाला.यावेळी प्रा.गुलदे बोलत होते.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती शिल्पाला रविंद्र पवार, प्रा. आर.एम.गुलदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी भीमराव कांबळे, सचिन कांबळे, चाफे मॅडम यांनी बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वा विषयी थोडक्यात आले विचार व्यक्त केले. यानंतर सामुदायिक बुद्धपुजापाठ घेण्यात आला.
यावेळी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव, सरचिटणीस रविंद्र पवार,उपाध्यक्ष संतोष कदम,महिला मंडळाच्या सरचिटणीस रुचिता कदम,ऋचा पवार,धोंडीराम तांबे,चंद्रकांत जाधव, बौद्धाचार्य सुरेंद्र यादव,मंगेश कांबळे,प्रफुल जाधव,रुपेश कांबळे,दीपाली जाधव,मनस्वी कांबळे या सह बहुसंख्येने धम्मबांधव-भगिनी उपस्थित होते.
