*संस्था अध्यक्ष अँड. नार्वेकर आणि कंपनी डायरेक्टर राकेश वालीया यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.१४-:* भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालया समोरील सुसज्ज इमारतीत १५ मार्चला अत्याधुनिक आयसीयू युनीट, 24 × 7 इमरजन्सी सर्व्हिस मिळणार आहे. हेल्दीकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडुन यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अपघातात जखमी, हृदयरोग आदी दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी सेवा मिळणार आहे. त्यामुळे रूग्णांना आता गोवा, कर्नाटक, मुंबई आदी ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही अशी माहीती कंपनीचे डायरेक्टर राकेश वालिया, आयुर्वेदिक संस्थेेचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी दिली. यात 8 हून अधिक आयसीयू, व्हेंटिलेटर युनिट असणार असून तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात आलेत. उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशिअन डॉ. अभिजीत चितारी, डॉ. मुरली चव्हाण यांसह डॉक्टरांची टीम इथं असणार आहे. याशिवाय स्थानिक दहा ते बारा जणांना सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे सावंतवाडी,दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ आदी तालुक्यातील रुग्णांना हे हेल्दीकॉन संस्थेच हॉस्पिटल वरदान ठरणार आहे. भाईसाहेब सावंत आयुर्वेदीक महाविद्यालया समोरील जागेत हे आयसीयू यूनिट सुरू करण्यात येत आहे. याचे उद्घाटन उद्या १५ मार्चला होणार आहे. याचा फायदा रुग्णांना होणार असून खासगी तत्वावर हे हॉस्पिटल सुरू करण्यात येतय. त्यामुळे सावंतवाडी आरोग्याच्या दृष्टीने अधिक बळकट झाली आहे.
