मळगाव येथील गाव मर्यादित भजन स्पर्धेत महापुरुष प्रासादिक भजन मंडळ सुतारवाडी प्रथम…

कै. मंगेश राऊळ व कै. केशव राऊळ स्मरणार्थ मळगाव माळीचे घराच्यावतीने आयोजन

*💫सावंतवाडी दि.१४-:सहदेव राऊळ* : कै. मंगेश नारायण राऊळ व कै. केशव सीताराम राऊळ यांच्या स्मरणार्थ मळगाव येथील माळीचे घर आयोजित मळगाव गाव मर्यादित भजन स्पर्धेत सुतारवाडी येथील महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. कै. मंगेश नारायण राऊळ व कै. केशव सीताराम राऊळ यांच्या स्मरणार्थ या मळगाव गाव मर्यादित भजन स्पर्धा-२०२१ चे आयोजन मळगाव माळीचे घरातील युवकांनी केले होते. स्पर्धेचे उदघाटन माळीच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती मोतीराम आत्माराम राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, उदय जामदार, ग्रामपंचायत सदस्या स्वरूपा राऊळ, हरी राऊळ, परीक्षक रुपेश पवार, विजय माधव आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून श्री गणरायाला वंदन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसही मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर भजन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक महापुरुष प्रासादिक भजन मंडळ सुतारवाडी, द्वितीय क्रमांक श्री देव महापुरुष प्रासादिक भजनमंडळ जोशी मांजरेकरवाडी व तृतीय क्रमांक श्री देव मायापूर्वचारी भजनमंडळ ब्राम्हणआळी यांना देण्यात आला. विजयी तिन्ही भजनी मंडळांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील वैयक्तिक परितोषिकात उत्कृष्ट झांजवादक समीर मांजरेकर (श्री देव महापुरुष प्रासादिक भजनमंडळ जोशी मांजरेकरवाडी), उत्कृष्ट तबलावादक भुवन राऊळ (श्री देव मायापूर्वचारी भजनमंडळ ब्राम्हणआळी), उत्कृष्ट पखवाज वादक प्रज्योत खडपकर (श्री देव मायापूर्वचारी भजनमंडळ ब्राम्हणआळी), उत्कृष्ट हार्मोनियम वादक सिद्धेश सावंत (श्री देव महापुरुष प्रासादिक भजनमंडळ सुतारवाडी), उत्कृष्ट गायक वैभव पाटकर (श्री देव महापुरुष प्रासादिक भजनमंडळ जोशी मांजरेकरवाडी) व सिद्धेश सावंत (श्री देव महापुरुष प्रासादिक भजनमंडळ सुतारवाडी) यांचा वैयक्तिक पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेतील सर्व सहभागी भजन मंडळांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण परीक्षक रुपेश पवार, विजय माधव, बुवा खेमराज सनाम, बुवा अमित परब, मळगावचे प्रसिद्ध भजनी बुवा बंटी मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या स्वरूपा राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण रुपेश पवार, विजय माधव यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री देव घरवडकर प्रासादिक भजमंडळ व माळीच्या घरातील युवका मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page