*मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा इशारा*
*💫सावंतवाडी दि.१४-:* शहरात काल काही ठिकाणी मटका व्यवसायिकांवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकत कारवाई केली. परंतु सावंतवाडी तालुक्यात अन्य शहरांमध्ये मटका मोठ्याप्रमाणात घेतलं जातो त्यामुळे महिन्याला दाखवण्यापुरती कारवाई नको तर कायमस्वरुपी कारवाई करा अशी मागणी सावंतवाडी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका घेतला जातो. परंतु याकडे जाणून-बुजून पोलिस दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे युवा पिढी बर्बाद होत आहे. तसेच युवा पिढी ही मटक्याकडे भरपूर जोडली गेली असून, ऑनलाइन देखील मटका स्वीकारला जातो आहे. त्यामुळे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आता मनसे स्टाईलने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच शहरात ठिक ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी करत असलेले मटक्यावरील कारवाईचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे.
