प्रवीण भोसले;भव्य पुस्तक प्रदर्शनासह महिलांचा संरक्षणाचा कार्यक्रम…
⚡सावंतवाडी ता.३०-: येथील राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ.अर्चना घारे परब यांचा वाढदिवस उद्या सेवा-भावी कार्यक्रमाने साजरा होणार आहे.याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे दिली.दरम्यान
अर्चना फाऊंडेशनच्या वतीने पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देखील श्री.भोसले यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री.भोसले पुढे बोलताना म्हणाले की अर्चना घारे गेले अनेक वर्ष या गोरगरीब जनतेसाठी काम करून त्यांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस सेवाभावी कार्यक्रमाने हा वाढदिवस साजरा होणार आहे.असे ही श्री. भोसले म्हणाले.
यावेळी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, नयहिम मेमन, आदी उपस्थित होते.
