कट्टा येथील १ रोजीचा आठवडा बाजार रद्द…

⚡मालवण ता.३०-: भारतीय नौदलाच्या वतीने नौसेना दिन कार्यक्रमाचे मालवण येथे आयोजन करण्यात आले असल्याने या पार्श्वभूमीवर मालवणकडे जाणाऱ्या महनीय व्यक्तींच्या गाड्यांच्या ताफ्यात अडथळे येऊ नयेत यासाठी यां मार्गावरील कट्टा बाजारपेठ येथे दि. १ डिसेंबर रोजीचा आठवडा बाजार जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे.

मालवणात होणाऱ्या नौदल कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम स्थळी अतिमहनीय व्यक्तींच्या गाड्यांचे ताफे कसाल- सुकळवाड- कट्टा -चौके मार्गे मालवण कडे जाणार आहेत. यावेळी या वाहनांच्या ताफ्यांना वाहतुकीच्या खोळंब्याचा फटका बसून अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठेचा शुक्रवार १ डिसेंबर रोजी भरविण्यात येत असणारा आठवडा बाजार पूर्णपणे रद्द (बंद) करण्यात आला आहे. याची बाहेरून येणाऱ्या व स्थानिक अशा सर्व व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने ग्रामपंचायत वरची गुरामवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page