“त्या” अपघातग्रस्त भागाला “रम्बलर” घालण्याचे काम सुरू…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा पाठपुरावा यशस्वी..

⚡कणकवली ता.३०-: राष्ट्रवादी (अजित पवार ) सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून कणकवली येथील
हळवल फाटा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या “त्या” अपघातग्रस्त भागाला अखेर “रम्बलर” घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे.


याबाबतची मागणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी राष्ट्रीय महामार्गाकडे केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणामुळे अनेक अपघात होत.वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे त्या ठिकाणी रम्बलर घालण्यात यावे, अशी मागणी नाईक यांनी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page