प्रथमेश तेली उपप्रादेशिक वाहन अधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली मागणी…
⚡सावंतवाडी ता.३०-: वाहन नोंदणीकरण व नवीन वाहन परवाना काढण्याच्या कॅम्प सावंतवाडी शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा चालू करण्यात यावा अशी मागणी भाजप मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रथमेश तेली यांनी उपप्रादेशिक वाहन अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
दरम्यान सावंतवाडी तालुक्यात नवीन वाहन घेणारे व नवीन वाहन परवाना काढणाऱ्या युवकांची संख्या सध्या परिस्थितीत वाढत चालली आहे, तसेच ग्रामीण व दुर्लभ भागातून युवकांना व ग्रामस्थांना नवीन परवाना व नवीन वाहन घेतले असल्यास ते नोंदणीकरण करायला ओरोस येथे जावे लागत आहे. त्यामुळे यात नागरिकांचे हाल होत आहेत तरी याचा विचार करून तो कॅम्प पुन्हा सावंतवाडी शहरातच सुरू करा अशी मागणी देखील श्री तेली यावेळी केली.
