सावंतवाडीत मनसेची उद्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा…

मिलिंद सावंत: उपस्थित राहण्याचं केले आवाहन..

⚡बांदा ता.३०-: सावंतवाडी तालुक्यातील मनसेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त सभा शुक्रवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी हॉटेल मँगो २ येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत तालुक्यातील मनसेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर व इतर पदाधिकारी पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणीबाबत व तालुका कार्यकारणीबाबत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page